नातं मग ते कोणतही असो, रक्ताचं-मानलेलं. त्यात उत्कटता हवी. ती जितकी अधिक तितकं ते नातं संपूर्ण होत जातं नि त्याच्या आधाराने समृद्ध होत जातं आपलं आयुष्य. ते नातं आहे तसच स्वीकारायला हवं, भरभरून जगायला हवं मात्र. इतक्या सुंदर नात्याची चिरफाड करीत गेलो अकारण तर मात्र आपल्या हाती उरतात त्या नात्याचे क्षीण, विरलेले धागे. त्यातून ना मायेची उब मिळत ना प्रेमाची. एक निरर्थक ओझं. न ते पांघरता येत ना फेकता येत. कारण समोरच्याने सोडून घेतले असतील त्याचे पाश, अगदी अलगद तरी आपलं मन तर गुंतलेल असतच न त्यांत. अगदी घट्ट. सगळ्यांनाच कुठे होता येतं निर्मम? काही माणसं असतातच कि वेडी. माझ्यासारखी..
No comments:
Post a Comment