Friday, April 5, 2013

तो काळ

तो जुना काळ डोळ्यासमोरुन झर झर वाहू लागला, मन आठवणी मध्ये रमू लागले, मागिल मार्च असाच आठवला, किती किती विचार केला होता, किती प्लान तयार केले होते तुला सरप्राईज करण्यासाठी व सर्वात शेवटी बारा वाजता रात्री तुझ्या घरी केक घेऊन आलो होतो, आठवतं तुला ? मी कुठे आहे, काय करत आहे हे सर्व विसरुन जणू मी हरवलो तुझ्या आठवणी मध्ये. राहून राहून तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण, तासन तास तुझ्याशी फोनवर मारलेल्या गप्पा, तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझ हळुच मिश्किल नजरेने मला पाहणं... व तुझ्या सोबत घालवलेले ती संध्याकाळ समुद्र किना-यावर.... कसा विसरु मी. तुझ्या सोबत खालेली ती मिसळ, तुला आठवतं ती मिसळ खुप टिखट होती व त्या मुळे लालबुंद झालेला तुझ्या नाकाचा शेंडा. मला सर्व काही आठवतं, प्रत्येक क्षण अन क्षण. नकळतच हात फोनकडे गेला व वाटले तुला एक फोन करावा पण, नंबर डायल करता करता अचानकच तू आलीस नजरे समोर.. तशीच जशी शेवट्च्या भेटी वेळी आली होतीस..

No comments:

Post a Comment